पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*पीक फेरपालटीचे फायदे

इमेज
*पीक फेरपालटीचे फायदे * *पीक फेरपालट ही एक प्राचीन  कृषी पद्धती आहे. वर्षानुवर्षे प्रत्यक्ष अभ्यासाने यात बदल होत आलेले आहेत.*  *१) जमिनीची सुपीकता वाढते.* विशिष्ट पीक हे जमिनीत विशिष्ट प्रकारची तत्वे सोडतात. तर काही विशिष्ट प्रकारची अन्नद्रव्ये शोषतात. त्यामुळे पिकांच्या फेरपालटाने जमिनीतील या पोषक तत्वांचे संतुलन होते व जमिनीची सुपिकता वाढते *२) पीकांचे उत्पादन वाढते.* फेरपालटीमुळे जमिनीतील न वापर झालेल्या अन्नद्रव्यांचा, साधनांचा वापर होतो व पीकांचे उत्पादन वाढते.  *३) मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते.* विशिष्ट पीकांमुळे मातीतील विशिष्ट प्रकारचे जिवाणू समृद्ध होत असतात त्यामुळे मातीच्या पोषक तत्वांमध्ये वाढ होते त्यामुळे  माती सुपीक व संतुलित बनते.   *४) रोग व कीडींना आळा बसतो.* फेरपालटीने रोग व कीड यांचा जीवन क्रम थांबतो. त्यांचे निवासस्थान नसल्याने त्यांची पुढील पिढी बंद होते. रोग व किडे पुढील पीकांत संक्रमित होण्याचा धोका टळतो.  *५) मातीच्या संरचनेत सुधारणा  होते.* पीक फेरपालटीने मातीच्या संरचनेत ही लक्षणीय सुधारणा होऊन परिणामी उत्प...

ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे

इमेज
ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचे! ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे कार्य आणि त्यांच्या कमतरतेची लक्षणे ज्या जमिनीमध्ये सातत्याने उसाची लागवड करण्यात येते अशा जमिनीत सेंद्रिय खतांचा कमी वापर, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर केला जातो. अशा प्रकारच्याजमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे शोषण खूप जास्त प्रमाणात झाल्यानेजमिनीमध्ये त्यांची कमतरता आढळते. त्यामुळे ऊस पिकातील कमतरतेची लक्षणे जाणून घेऊन शिफारशीत मात्रेत सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. ऊस पिकातील जोमदार वाढ आणि उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरतेची लक्षणे आणि त्यांचे कार्य जाणून घेऊ.   ऊस पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कार्य आणि कमतरतेची लक्षणे           ऊस पिकातील लोहाचे कार्य 1- हरितद्रव्य तयार करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. 2- पानांचा रंग गडद हिरवा तयार होण्यास मदत होते. 3- इतर अन्नद्रव्यांच्या शोषणासाठी मदत करते. 4- झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक. 5- नवीन येणारी पाने पिवळी दिसतात व शिरा ...