फुलशेती विषयी प्राथमिक माहिती
फुलशेती विषयी प्राथमिक माहिती आज शेतकरी बांधव शेतात नवीन नवीन प्रयोग करत आहे. फुलशेती हा असाच एक यशस्वी प्रयोग आहे. मात्र अनेक शेतकरी प्राथमिक माहिती नसताना फुलशेती करतात आणि आर्थिक नुकसानीच्या विळख्यात सापडतात. चला तर पाहुयात फुलशेतीची प्राथमिक माहिती…. ∆फुलशेती करताना खालील मुद्दे खूप महत्वाचे आहे. *योग्य हवामान आणि जमीन *सिंचन सुविधा *शेडनेट किंवा पॉलीहाऊस *योग्य खत व्यवस्थापन *तोडणी, प्रतवारी आणि पॅकिंग *मार्केटिंग ∆कोणत्या फुल पिकांची लागवड करावी ? *गुलाब *जरबेरा *कार्नेशन *मोगरा *अस्टर *शेवंती *झेंडू *ऑर्किड *स्टाटीस *निशिगंध *जाई आणि जुई *अंथुरियम ∆कोणत्या फुलांना मार्केट मध्ये सतत मागणी असते ? *गुलाब *झेंडू *जरबेरा *ऑर्किड *कार्नेशन ∆कोणत्या हंगामात फुलाची मागणी जास्त असते ? फेब्रुवारी महिन्यात गुलाब फुलांची मागणी भरपूर असते. श्रावण, दिवाळी, दसरा या भारतीय सणाच्या काळात झेंडू, शेवंती, जाई जुई या फुलांना चांगले मार्केट असते. पंचतारांकित हॉटेलात, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जरबेरा, कार्नेशन, ऑर्किड अश्या विदेशी फुलांची १२ महिने मागणी असते. मोगरा, जाई व जुई अश...