Pashudhan Bima Yojana : जनावरांच्या आकस्मिक मृत्यूवर मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या कशी?
Pashudhan Bima Yojana : जनावरांच्या आकस्मिक मृत्यूवर मिळणार नुकसानभरपाई, जाणून घ्या कशी? सध्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटविषयी आपण म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अर्थात शेती व्यवसाय येतो त्याचबरोबर पशुसंवर्धन, पशुपालनाचा व्यवसायही येत असतो. बोलायचे झाले तर त्याची दोन साधने म्हणजे शेती आणि पशुसंवर्धन. बहुतांश शेतकरी गाई-म्हशींचे पालनपोषण करून चांगला नफा कमावत आहेत. परंतु अनेकदा शेतकरी पिकांच्या आणि प्राण्यांच्या असुरक्षिततेबद्दल चिंतेत असतात, जसे की नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट झाले तर नाहींना किंवा जनावरे कोणत्याही रोग, हवामान किंवा अपघातास बळी पडले नाहीत ना. पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱअयांना नुकसान भरपाई मिळत असते. सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळत असते. शेतकरी पिकांसाठी पीक विम्याचा लाभ नुकसान भरपाई मिळून घेत असतात. मात्र जनावरांचा विमा काढण्यास विसरतात, त्यामुळे शेतकऱ्याला मोठे नुकसान सहन करावे लागते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी पशुधन विमा योजना सुरू केली आहे. (Pashudhan Bima Yojana) याअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो. तर मग आम्ही त...