कोरोना : होम क्वारंटाईन म्हणजे काय? कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
कोरोना : होम क्वारंटाईन म्हणजे काय? कोरोना व्हायरसची लागण इतरांना होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची? कोरोनाची लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना 'होम क्वारंटाईन' म्हणजेच घरात विलगीकरण करून घेण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यासाठीची नवी नियमावली राज्य सरकारने प्रसिद्ध केलीय. होम क्वारंटाईन म्हणजे नक्की काय? आणि होम क्वारंटाईन झाल्यावर काय काळजी घ्यायची? हा प्रश्न प्रत्येकाला पडलाय. या प्रश्नांचीच उत्तरं जाणून घेऊयात. क्वारंटाईन' शब्द आला कुठून? 14व्या शतकात जगात अनेक ठिकाणी प्लेगची साथ होती. या काळात व्हेनिस शहराच्या बंदरात अनेक बोटी जगभरातून दाखल होत. पण या जहाजांमधून 40 दिवस कोणीही बाहेर पडू शकत नसे. बोटीवरच्या कोणालाही प्लेग किंवा दुसरा संसर्गजन्य आजार नाही, याची खात्री या 40 दिवसांत केली जाई आणि मगच खलाशांना उतरण्याची परवानगी मिळे. ' क्वारंटिना ' या मूळ इटालियन शब्दाचा अर्थ होतो - 40, आणि त्यावरूनच आला शब्द ' क्वारंटाईन '. हाच शब्द सध्या सतत आपल्या कानावर पडतोय. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना क्वारंटाईन केलं जातंय. यासा...