जिप्सम म्हणजे काय? जाणून घ्या काय होतो याचा फायदा
जिप्सम म्हणजे काय? जाणून घ्या काय होतो याचा फायदा जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगले प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रुपांतरीत होते. जिप्सममुळे खालील फायदे होतात. 1.जिप्सममुळे जमिनीची सुपीकता वाढवते. 2.जमीन भुसभुशीत होते. 3.जमिनीची रचना बदलण्यास मदत होते. 4.क्षारपड जमिनीतील सोडियम क्षारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात. त्यामूळे ते बाहेर फेकले जाऊन जमीन सुधारते. 5.बियाण्याची उगवण चांगली होते. 6.पाण्याबाहेर येणारे क्षार जिप्सम मुळे कमी होतात. ं 7.जमिनीची धूप कमी होते. 8.पाण्याचा निचरा होऊन जमीन पाणथळ होत नाही. 9.जमिनीतल्या कॅल्शियम – माग्न्येशियामचे प्रमाण सुधारते. 10.सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. 11.जिप्सममुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते. 12.जिप्सममुळे फळांची गुणवत्ता सुधारते. 13.भुईमुग, कलिंगड, टोमाटो, बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. 14.जिप्सम मुळ...