फायदेशीर मेथी लागवड
फायदेशीर मेथी लागवड मेथी ही राज्यातील प्रमुख शेंगा वर्गीय भाजीपाला पिक असून मेथीचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. मेथीचे पिक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात घेतले जाते. काही शेतकरी जवळजवळ वर्षभर मेथीचे पिक घेतात. मेथीमध्ये जीवनसत्व अ, ब, आणि क, कॅल्शिअम, कॅरोटीन, लोह व प्रथिने असल्याने आरोग्यासाठी चांगले असते. मेथी ही पाचक असून यकृताची कार्यक्षमता वाढविते. त्यामुळे पचनक्रिया चांगल्याने होते, तसेच मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथी ला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो. मेथीच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात पुढील अन्नघटक असतात. पाणी 86 कार्बोहायड्रेटस् 6.0 प्रोटीन्स् 4.4 फॅटस् 0.9 तंतुमय पदार्थ 1.1 खनिजे 1.5 मॅग्नेशियम 0.07 फॉस्फरस 0.005 सोडियम 0.08 कॅल्शियम 0.4 पोटॅशियम 0.05 लोह 0.02 सल्फर 0.02 क्लोरीन 0.02 जीवनसत्व अ 6450 जीवनसत्व क 0.05 उष्मांक (कॅलरीज) 49 हवामान मेथीचे पीक हे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामा...