खरीपची तयारी करत आहात? बियाणे खरेदी करतेवेळी काय घ्याल काळजी
खरीपची तयारी करत आहात? बियाणे खरेदी करतेवेळी काय घ्याल काळजी आता काही दिवसांमध्ये पेरणीचे दिवस डोक्यावर येऊन ठेपले आहेत सगळीकडे खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन झाले की वेग वेगळ्या भागांमध्ये पेरणीला सुरुवात होते. परंतु आपल्याला माहिती आहे की पेरणीसाठी उत्कृष्ट प्रमाणित बियाणे असणे हे फार आवश्यक असते. बियाणे जर निकृष्ट दर्जाचे असेल तर त्याचा पूर्ण फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो आणि पूर्ण हंगाम वाया जातो. तसे पण मागच्या वर्षी पाहिले की सोयाबीन पट्ट्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही परिणामी याचा सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. म्हणून बियाणे खरेदी करायच्या अगोदर बळीराजाने कोणती काळजी घ्यावी यासंबंधीचे विवेचन या लेखात करण्यात आले आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ते आपण पाहू. 1) बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी सगळ्यात अगोदर लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे बियाणे खरेदी करताना ते परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. 2) दुसरे महत्त्वाचे म्हणजे जेव्हा बियाणे खरेदी कराल तेव्हा संबंधित विक्रेत्या...