भारतातील सर्वाधिक लाभदायक पिके
भारतातील सर्वाधिक लाभदायक पिके आपण सर्वाना ज्ञात आहे की, कृषी हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. व उत्पन्नाच्या दृष्टीनेही कृषी क्षेत्र खुप महत्वाची भूमिका बजावतो. बहुसंख्य देशांची तर अर्थाव्यवस्था ही कृषीवर अवलंबून असते कृषिप्रधान असते. आपल्या देशाची अर्थव्यवस्था देखील कृषीवर अवलंबून आहे व आपणही कृषिप्रधान देशाच्या यादीत अग्रस्थानी येतो. आज आपण भारतातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची माहिती बघणार आहोत. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे जो की, कृषी क्षेत्रात सामील आहे. भारताच्या अर्थाव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा खुप मोठा वाटा आहे. समायानुरूप भारतातील शेतीचा खुप मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आणि अजूनही नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. ज्याने भारतातील कृषी क्षेत्र अधिकाधिक मजबूत होत आहे आणि अन्नधान्यची वाढती मांगणी ह्या क्षेत्राला अजूनच उंची वरती घेऊन जात आहे. तर मग चला आज आपण माहिती घेऊयात भारतातील सर्वाधिक लाभदायक पिकांची. भातशेती यादीत भाताला पहिला क्रमांक दिला. भात हे आत्याधिक खपत होणारे कडधान्य आहे आणि त्यामुळे भाताला आत्याधिक मागणी आहे. हेच ...