पोस्ट्स

अन्नद्रव लेबलसह पोस्ट दाखवत आहे

माती तपासणी का करावी व कशी करावी आणि उपाय.

इमेज
माती तपासणी का करावी व कशी करावी. आणि उपाय यापैकी नत्र, स्फुरद, गंधक, लोह व जस्त यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आढळून आलेली आहे. खतांचा असमतोल वापर यापुढे याचपध्दतीने होत राहिला तर भविष्यात जमिनीचे आरोग्य बिघडणे आणि सुपिकता कमी होवून पिकांची उत्पादकता घटण्याबरोबरच निकृष्ट दर्जाची जमिन पुढील पिढीस हस्तांतरीत करण्याची नामुष्की आपणावर येण्याचा मोठा धोका आहे. यासाठी शेतकर्‍याने स्वत:च्या जमिनीचे माती परिक्षण करुन घेणे आणि त्याच्या तपासणी अहवालानुसार येणार्‍या शिफारशी प्रमाणे खतांचा वापर करणे व जामिनीचे व्यवस्थापान करणे आवश्यक आहे. त्यामुळे पिक उत्पादनांत वाढ होऊन खताच्या वापरावर होणारा अवाजवी खर्च कमी होणार आहे. माती परिक्षणाचे फायदे : जमिनीतील घटकांचे प्रमाण तसेच जमिनीतील दोष समजतात. जमिनीच्या प्रकारानुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. जमिन सुधारण्यासाठी नियोजनबध्द उपाययोजना करता येतात. खतांची संतुलीत मात्रा मिळाल्यामुळे पिकांची वाढ चांगली होते. आवश्यक तेवढेच खत दिल्यामुळे आर्थिक बचत. जमिनीत संतुलीत खतांचा पुरवठा झाल्यामुळे तिची उत्पादन क्षमता टिकून राहते. माती परिक्षणामुळ...