नोव्हेंबर महिन्यात 'ह्या' पिकांची लागवड करा आणि करा बक्कळ कमाई
नोव्हेंबर महिन्यात 'ह्या' पिकांची लागवड करा आणि करा बक्कळ कमाईमित्रांनो थंडीला सुरवात झाली आणि शेतकरी राजांची रब्बी हंगामासाठी लगबग देखील सुरु झाली. शेती हा बारामाही चालणारा व्यवसाय आहे आणि शेतकरी आपल्या ह्या व्यवसायात अहोरात्र मेहनत घेत असतो. नोव्हेंबर महिना हा शेतीसाठी महत्वपूर्ण आहे ह्या काळात थंडीची सुरवात झालेली असते आणि ह्यामुळे शेतकरी राजा अजून जोमाने शेतीकामासाठी सुरवात करत असतो. गव्हाच्या लागवडीचा हंगाम म्हणुन नोव्हेंबर महिना ओळखला जातो. भारतात शेतकरी नोव्हेंबर महिन्यात गहु पेरणीला उत्तम मानतात. गहु व्यतिरिक्त अजूनहि अनेक पिकांची ह्या महिन्यात लागवड केली जाते. आज आपण नोव्हेंबर महिन्यात कोणत्या पिकांची लागवड करून शेतकरी बांधव दर्जेदार उत्पादन प्राप्त करू शकतो ह्याविषयीं जाणुन घेणार आहोत. गहु भारतात नोव्हेंबर मध्ये गहु लागवडीला शेतकरी बांधव पसंती देतात. गहु हे एक व्यापारी पिक आहे आणि ह्याची मोठ्या प्रमाणात भारतात लागवड केली जाते. गव्हाच्या उत्पादनात भारताचे एक महत्वपूर्ण स्थान आहे ह्याची लागवड आपल्या महाराष्ट्रात देखील लक्षणीय आहे. शेतकरी राजांनो जर आपणही गहु...