पोस्ट्स

Dragan fruits लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ

इमेज
आरोग्यदायी ड्रॅगन फळ व प्रक्रियायुक्त पदार्थ ड्रॅगन फळ हे २१ व्या शतकातील आश्चर्यकारक फळ म्हणून ओळखले जाऊ लागले असून त्याने भारतीय फलोत्पादनामध्ये सद्यस्थितीत एक क्रांती घडवून आणली आहे. शेतकरी आणि ग्राहकांना एक वरदान ठरले आहे. ड्रॅगन फ्रूट या फळाचे मध्य अमेरिका, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका येथे व्यावसायिक उत्पादन केले जाते. अलीकडे भारतामध्येही या पिकाची लागवड सुरू झाली आहे. ड्रॅगन फ्रूट ही निवडुंग प्रकारातील वेल वनस्पती आहे. हायलोसेरेयस ही त्याची प्रजाती आहे. याच्या जातींमध्ये विविधता आढळते. वरून गुलाबी रंग व आतील गर पांढरा, वरून पिवळा व आतील गर पांढरा व वरून गुलाबी व आतून गर गुलाबी अशा तीन प्रकारांत हे फळ येते. या फळाला आशियाई देशात पिताहाया किंवा पिताया म्हणतात. वेल छत्रीसारखी दिसते. साधारणतः या वेलीची आयुष्य मर्यादा १७ ते २० वर्षे एवढी असते. वाढीसाठी व आधारासाठी स्तंभ (पोल) व गोल कड्यांचा वापर होतो. कोणत्याही जमिनीत हे पीक येत असले तरी पोषक जमीन, नियंत्रित व नियमितपणे खते दिल्यास त्याच्यापासून चांगले उत्पादन मिळते. या वेलाची फुले रात्री उमलतात. त्यांचे पराग सिंचन नि...