पोस्ट्स

farming लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जमिनीतील ओलावादर्शक उपकरण

इमेज
जमिनीतील ओलावादर्शक उपकरण जमिनीतील ओलावा दर्शविणारे उपकरण भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या कोइमतूर येथील ऊस पैदास संस्थेने विकसित केले आहे. शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचे स्रोत कमी होत आहेत, ही चिंतेची बाब आहे. शेतीमध्येही ऊस, केळी, कापूस यांसारखी नगदी पिके उपलब्ध पाण्यापैकी मोठा हिस्सा खेचून घेतात. या सर्व पिकांमध्ये पिकांच्या आवश्यकतेपेक्षी कमी किंवा अधिक पाणी दिल्यास उत्पादकतेवर परिणाम होतो. त्याच प्रमाणे कमी ओलावा असताना पिकाला मातीत उपलब्ध असलेली अन्नद्रव्येही घेण्यात अडचणी येतात. तसेच अतिपाण्यामुळे क्षारांचे प्रमाण वाढून जमिनीची सुपीकताही धोक्यात येते. आपल्या शेतजमिनीमध्ये ओलावा किती आहे, याचीच अनेक शेतकऱ्यांना माहिती नसते. त्याविषयी सारे अंदाज बांधले जातात. म्हणूनच पिकाला नेमके पाणी किती द्यायचे, कधी द्यायचे याविषयी शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन करत असतात. मातीतील ओलावा जाणून घेण्यासाठी कोइमतूर येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या ऊस पैदास संस्थेमध्ये ओलावा दर्शक पकरण विकसित केले आहे. हे वापरण्यास सोपे असून, किंमतही कमी आहे. २०१६ मध्ये संस्थेचे संचालक डॉ. राम बक्षी यांच्या ह...

अ‍ॅग्रोकेमिकल्स आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे प्रभाव

इमेज
अ‍ॅग्रोकेमिकल्स आणि त्यांचे पर्यावरणावर होणारे प्रभाव अ‍ॅग्रोकेमिकल्स : हे खते आणि कीटकनाशके यासारख्या रसायनांना(chemicals) दिले गेलेले सामान्य नाव आहे. नावाप्रमाणेच अ‍ॅग्रोकेमिकल्स शेतीमध्ये वनस्पतींच्या वाढीस आणि संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते . त्यांना कृषी रसायने देखील म्हणतात अनेक आजारांना निमंत्रण : रसायने ही पिकाचे उत्पादन सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत , तथापि, याचा अतिवापर आता पर्यावरणावर मोठा परिणाम दिसून येत आहे . अ‍ॅग्रोकेमिकल्स आपल्या आजूबाजूच्या जमीन आणि जल संस्थांमध्ये जातात आणि अन्न साखळीत प्रवेश करतात.अशा रसायनांचा जास्त प्रमाणात वापर केल्याने महत्त्वपूर्ण प्रमाणात अवशेष निर्माण होतात. या अवशेषांमुळे पोषक असंतुलन आणि कृषी उत्पादनांची गुणवत्ता-कपात होते. या अवशेषांच्या वापरास विविध आजारांशी जोडले गेले आहे. उदाहरणार्थ, अन्नातील कीटकनाशकांच्या अवशेषांमुळे मानवांमध्ये दम्याचा धोका वाढू शकतो.मातीवर परिणाम: रसायनाचा मोठया प्रमाणात वापर केल्याने ते मातीसाठी फायद्याच्या इतर जीवांचा नाश करू शकतात. मातीत नायट्रेटचे प्रमाण वाढते. पीएच पातळी बद...