पोस्ट्स

पावुस लेबलसह पोस्ट दाखवत आहे

राज्यात ९९ टक्के पावसाची शक्यता

इमेज
राज्यात ९९ टक्के पावसाची शक्यता राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीचा दीर्घकालीन पावसाचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व कृषी हवामान फोरम साऊथ आशियाचे संस्थापक सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी मंगळवारी (ता. १) जाहीर केला. यंदा राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. यामध्ये पाच टक्के कमीअधिक तफावत आढळून येण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासाठी २०२१ साठी जून ते सप्टेंबर मॉन्सून पावसाचा अंदाज वर्तविला आहे. स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या तीस वर्षांचे हवामान आणि कृषी विद्यापीठाच्या हवामान केंद्रांनी नोंदवलेली यंदाची हवामान घटक विचारात घेण्यात आले आहेत. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात पावसात अकोला, पाडेगाव निफाड येथे खंड राहण्याची शक्यता असून दापोली, पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे. ...