जाणून घेऊ फरक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि नॉर्मल ट्रॅक्टर मधील
जाणून घेऊ फरक इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि नॉर्मल ट्रॅक्टर मधील शेतीच्या मशागतीसाठी आता यंत्रांचा वापर होत आहे. नांगरणी आणि इतर च्या कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर अधिक प्रमाणात होत असतो. परंतु दिवसेंदिवस इंधनाचे दर गगनाला भिडत असल्याने आपल्या खिशाला कात्री बसत असते. ट्रॅक्टर म्हणा किंवा इतर वाहने यांच्या इंधनावरती मोठा पैसा खर्च करावा लागतो. परंतु शेतीच्या कामासाठी आपण ट्रॅक्टर नाही वापरला तर आपली कामे पडून राहतील. आता बाजारात असे ट्रॅक्टर येणार आहे जे आपला पैसा आणि वेळ वाचणार आहे. या आधी इलेक्ट्रिक बस, कार विषयी ऐकलं वाचला असेल. इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे आपल्या इंधनावर होणारा खर्च आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचणार आहेत. काय फरक आहे डिझेल ट्रॅक्टर आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मध्ये या दोन्ही ट्रॅक्टर मधील मुख्य फरक म्हणजे त्यांच्या ऑपरेटिंग किंमत. ई ट्रॅक्टरचा ऑपरेटिंग खर्च एका तासामध्ये सुमारे 25 ते 30 रुपये असेल. तर सामान्य ट्रॅक्टर चालवण्यास तर तासाला सुमारे दीडशे रुपये खर्च येतो. ती ट्रॅक्टर प्रति तासाला शेतकऱ्यांचे सुमारे 120 रुपयांची बचत करेल. जर प्रत्येक तासाला तुमच्या...