अशी करा अस्टर फुलाची लागवड; जाणून घ्या! कोणत्या आहेत परदेशी जाती
अशी करा अस्टर फुलाची लागवड; जाणून घ्या! कोणत्या आहेत परदेशी जाती अस्टर हे हंगामी फूल पीक असून त्यामध्ये पांढऱ्या, लाल, गुलाबी, जांभळ्या रंगाची फुले विशेषतः आढळतात. अस्टरची लागवड संपूर्ण देशात तसेच राज्यात मोठ-मोठ्या शहरांच्या भोवती केली जाते.अस्टरची फुले फुलदाणीत सजावटीसाठी तसेच हारांमध्ये वापरली जातात. अस्टरची फुले व कट फ्लावर म्हंणून तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये वापरली जातात. बगीच्यामध्ये रस्त्यालगत तसेच कुंड्यांमध्ये अस्टरची लागवड केली जाते हवामान व जमीन अस्टर हे मुख्यत्वे करून थंड हवामानाचे पीक असून त्याची लागवड वर्षातील तिन्ही हंगामात केली जाते. थंड हवामानात अस्टरची वाढ चांगली होते व फुलांचा दर्जादेखील चांगला असतो. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. उन्हाळी हंगामात जास्त तापमान वाढल्यास वाजवीपेक्षा जास्तीत-जास्त दर्जेदार फुले मिळण्यासाठी बियाण्याची रोपासाठी पेरणी सप्टेंबर / ऑक्टोबर महिन्यात करावी. अस्टरची लागवड निरनिराळ्या जमिनीमध्ये करतात. परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन या पिकास चांगली मानवते. काळी कसदार भारी व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत रो...