एकदा हे वाचाच : पावसाळ्यात "सर्पदंश" होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?
एकदा हे वाचाच : पावसाळ्यात "सर्पदंश" होऊ नये म्हणून काय काळजी घ्याल? पावसाळा चालू झाला की मानवी वस्तीमध्ये साप आढळण्याचे प्रमाण वाढते. आणि यातूनच सापांना मारण्याच्या घटना व सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होते. पावसाळा सुरु होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर साप राहत असलेल्या बिळामध्ये पाणी साचते त्यामुळे भक्ष्य व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जुन- ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्तीच्या आसपास आढळून येतात. म्हणुन या काळात नागरिकांनी साप दिसला तर घाबरुन न जाता या आपातकालीन परिस्थीची शास्त्रीय माहिती घ्यायला हवी.भारतात आढळणाऱ्या 52 विषारी सापांच्या जातीपैकी परिसरात मानवी वस्तीजवळ केवळ चारच जाती या विषारी आहेत. त्या म्हणजे नाग, मण्यार, घोणस व फुरसे या आहेत. 1) घराच्या भिंती व कुम्पनाच्या भिंती यांना पडलेली भोक बुजवावेत. यांमध्ये उंदरासारखे प्राणी बसतात व त्यांची शिकार करण्यासाठी साप येण्याची शक्यता असते. 2) घराजवळ पाला- पाचोळा, कचऱ्याचे ढिग, दगड- विटाचे ढिग, लाकडांचा साठा करुन ठेऊ नये. 3) घराच्या आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवा. 4) खिडक्या- दरव...