पोस्ट्स

संसर्गजन्य आजार लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि औषध उपचार

इमेज
पावसाळ्यात जनावरांना होणारे आजार आणि औषध उपचार शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. पशुपालन यातून शेतकऱ्यांना दूध, शेणखत मिळते आणि त्यातून शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. चांगल्या उत्पादनासाठी पैशांची काळजी घेतली गेली, पाहिजे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये जनावरांची काळजी त्यांची निगा व्यवस्थित ठेवली पाहिजे. सध्या पावसाळा चालू आहे, या दिवसात जनावरांची विशेष काळजी घेतली जाणे फार महत्वाचे आहे. पावसाळ्यात जिवाणू, विषाणूंच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आणि जनावरे अनेक संसर्गजन्य आजाराला बळी पडतात. हे टाळण्यासाठी या काळात जनावरांची योग्य काळजी घ्यावी. पावसाळ्यामध्ये जनावरांची काळजी कोणत्या प्रकारे घ्यावी. याबद्दलची सखोल माहिती या लेखात आपण घेणार आहोत. पोट फुगणे – हिरवा व कोवळा चारा जास्त प्रमाणात खाल्याने जनावरांचे कोटी पोट फुगते. कोटी पोट डाव्या बाजूला असल्याने पोटाकडे ची डावी बाजू फुगे सारखे दिसते. पोटात तयार होणारा गॅस तोंडावाटे बाहेर न पडता पोटात साठून राहतो अशावेळी जनावर खाली पडून उठू शकत नाही. फुगलेल्या पोटाचे वजन हृदयावर व फुफुसावर पडल्याने जनावर दगावण्याची शक्यता ...