पोस्ट्स

ई पीक पाहणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ई पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार का?

इमेज
ई पीक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहणार का? शेतकरी आता स्वत: शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकणार आहेत. यासाठी कृषी आणि महसूल विभागानं संयुक्तपणे ई-पीक पाहणी नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. याशिवाय रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी शेतकरी 16 ऑक्टोबरपासून करू शकणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. एखादा शेतकरी काही तांत्रिक किंवा इतर अडचणींमुळे पीक पाहणी करू शकला नाही, तर त्याचा सातबारा उतारा कोरा राहणार नाही आणि त्याला सरकारी योजनांपासून वंचित ठेवलं जाणार नाही, असंही जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, ई-पीक पाहणी उपक्रम काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, शेतकऱ्यांना पीक पाहणी करताना कोणत्या अडचणी येत आहेत आणि त्यावर सरकारचं काय म्हणणं आहे, या सगळ्यांवर बीबीसी मराठीनं महाराष्ट्र राज्याच्या ई-फेरफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत . प्रश्न - ई- पीक पाहणी प्रकल्प नेमका काय आहे? उत्तर - शेतकऱ्यानं स्वत: आपल्या शेतातल्या पिकांची नोंद ऑनलाईन पद्धतीनं नोंदवणं याला ई-पीक पाहणी असं म्हटलेलं आहे...