पोस्ट्स

seed treatment लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बीजप्रक्रिया पद्धती व त्यांचे फायदे

इमेज
बीजप्रक्रिया पद्धती व त्यांचे फायदे कृषी उत्पादनात पिक संरक्षणास जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व बीज प्रक्रियेस आहे. परंतु बियाणे प्रक्रियेस जेवढे महत्व पिक संरक्षणामध्ये द्यावयास हवे तेवढे दिले जात नाही. निरनिराळ्या औषधांच्या फवारण्यांमुळे उभ्या पिकावरील किडी व रोगांचे नियंत्रण होते तर बियाणे प्रक्रीयेमुळे बियांवरील सुप्तावस्थेत असलेल्या रोगांचे तसेच इतर जिवाणूंचे नियंत्रण सुरुवातीसच होते. उभ्या पिकात दिसणाऱ्या बऱ्याच रोगांचे मूळ बियांमध्ये असते. एकदा असे रोगट बी उगवून आले कि, त्यामधील रोगासाठी खात्रीशीर असा नियंत्रण उपाय राहत नाही. बीज प्रक्रिया म्हणजे काय? : सर्वसाधारणपणे बीज प्रक्रिया म्हणजे हलके, किडके, रोगयुक्त, आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करुन अशा बियाण्याचे रोग व किडींपासून संरक्षण व्हावे म्हणून औषध लावण्यापर्यंतच्या प्रक्रियेला ‘बीजप्रक्रिया’ म्हणतात. बीज प्रक्रियेचे फायदे : १. पेरणीसाठी एकसारखे बियाणे उपलब्ध होते व पेरणी सुलभ होते. २. बियाणे व रोगांद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण करता येते. ३. बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते व रोपांना शेतात प्...