हमीभाव 2021-22 : खरीप पिकांसाठीचे हमीभाव जाहीर, पाहा कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळणार?
हमीभाव 2021-22 : खरीप पिकांसाठीचे हमीभाव जाहीर, पाहा कोणत्या पिकाला किती हमीभाव मिळणार? केंद्र सरकारनं खरीप हंगाम 2021-22 करिताचे हमीभाव आज (9 जून) जाहीर केले आहेत. सरकारनं जारी केले्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान हमी भावातील सर्वाधिक वाढ तीळाला (452 रुपये प्रति क्विंटल) देण्याची शिफारस मंजूर करण्यात आली आहे. त्याखालोखाल तूर आणि उडीद डाळीला प्रत्येकी 300 रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ देण्याची शिफारस मंजूर करण्यात आली आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर ही माहिती दिली आहे. खरीप 2021-22 साठीचे हमीभाव - खरीप 2021-22 साठीचे हमीभाव हमीभाव म्हणजे काय? MSP म्हणजेच Minimum Support Price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोली भाषेत हमीभाव असं म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हमीभाव ही एक प्रणाली आहे, ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असतं... गॅरेंटी देत असतं. या प्रणालीअंतर्गत सध्या 23 शेतमालांची खरेदी सरकार करतं. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शें...