पोस्ट्स

वॉल फार्मिंग लेबलसह पोस्ट दाखवत आहे

इस्राईलने कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी एक शक्कल शोधून काढलीये

इमेज
इस्राईलने कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी एक शक्कल शोधून काढलीये शेती क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग सुरु असतात. विशेषत: इस्राईलसारख्या देशात जिथे शेतजमिनीची कमतरता असते, तिथे शेतीसाठी विविध पर्याय अवलंबले जातात. आजच्या काळात संपूर्ण लोकसंख्येला मुबलक अन्नधान्य पुरवठा करणे ही नेहमीच एक आव्हानात्मक समस्या राहिली आहे. शेतीसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा काळात या नव्या तंत्रज्ञानाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष बाब म्हणजे या शेतीसाठी तुमच्याकडे जमीन असलीच पाहिजे अशी अट नाही. सध्या सगळीकडेच शेतजमिनींची कमतरता जाणवत आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घराच्या भिंतीवरही शेती केली जाऊ शकते. इस्राईलमध्ये हे तंत्रज्ञान सध्या जास्त लोकप्रिय झालेले आढळते. इस्राइलमधील अधिकाधिक लोक याप्रकारच्या शेतीचा अवलंब करत आहेत. इस्राईलमध्ये शेती योग्य जमिनीची कमतरता असल्याने तिथे व्हर्टीकल फार्मिंगची पद्धती मोठ्या प्रमाणात अवलंबली जात आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि शेतजमिनीची कमतरता, यावर ही शेती पद्धती जास्त प्रभावकारी ठरू शकते. दाट लोकसंख्येच्या शहरात जिथे शेत जमीन खूप दूर ...