पोस्ट्स

how to install oxygen gas in oxygen cylinder लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोरोना : ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राची लढाई, काय आहेत अडचणी आणि उपाय?

इमेज
कोरोना : ऑक्सिजनसाठी महाराष्ट्राची लढाई, काय आहेत अडचणी आणि उपाय? ऑक्सिजनला मराठीत प्राणवायू का म्हणतात, ते वेगळं सांगायची गरज नाही. पण कोरोना विषाणूच्या साथीनं प्राणवायू किती महत्त्वाचा आहे पुन्हा आठवण करून दिली आहे. रुग्णांना ऑक्सिजनचा नियमित पुरवठा करणं, हे सध्या भारतात आरोग्य व्यवस्थेसमोरचं मोठं आव्हान बनलं आहे. विशेषतः महाराष्ट्रात, ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी चिंता व्यक्त केली आणि मंगळवारी फेसबुकद्वारा जनतेशी संवाद साधताना आपण केंद्र सरकारला हवाई मार्गे ऑक्सिजन पुरवठ्याविषयी विनंती केली असल्याचं सांगितलं. पण परिस्थिती नेमकी किती दाहक आहे? ऑक्सिजनच्या पुरवठ्यामध्ये काय अडचणी असतात आणि मुळात ऑक्सिजनचा कोव्हिडच्या रुग्णांना काय फायदा होतो? महाराष्ट्रात ऑक्सिजनची टंचाई केवढी मोठी? महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात दररोज साधरण 1200 मेट्रीक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं. वैद्यकीय तसंच औद्योगिक कारणांसाठी हा ऑक्सिजन वापरला जातो. सध्या कोव्हिडची साथ बघता राज्यातला 100 टक्के ऑक्सिजन आरोग्य सुविधांसाठी राखीव...