कोरडवाहू फळ पिकांसाठी मटका सिंचन
कोरडवाहू फळ पिकांसाठी मटका सिंचन महाराष्ट्रात रोजगार हमी योजना व राष्ट्रीय फळबाग अभियान यातून फळपिकांची विक्रमी लागवड झाली आणि महराष्ट्राचा फळ उत्पादनाचा टक्का वाढला परंतु आजची स्थिती पहिली तर लहरी हवामान कधी दुष्काळ तर कधी गारपीठ, रोग प्रतिकारक व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींसाठी संशोधनाची गरज असे अनेक फळबाग लागवडीपूर्व प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहेत तरीही शेतकरी न डगमगता त्या प्रश्नांचा सामना करतो आहे. महाराष्ट्रात कोरडवाहू तसेच बागायती फळ पिकाखालील लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसते आहे, दिवसेंदिवस वाढते तापमान मानवी आरोग्य बरोबर पक्षी, प्राणी व इतर जीव त्याचबरोबर पिकांसाठी धोक्याची घंटा वाजवित आहे. या काळात फळ पिकात बहार नियोजन करणे दूरची गोष्ट फळपिकां खालील क्षेत्र वाचविणे मोठ्या जिकीरीचे झाले आहे यावर उपाय म्हणून ठिबक सिंचनातून पाण्याची कमालीची बचत होते आहे परंतु आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व शेतकऱ्यास हे शक्य नाही अशा परीस्थितीत कमी भांडवलात आधुनिक ठिबक सिंचनाचे फायदे देणारे सोपे तंत्र मटका सिंचन नक्कीच फायद्याचे ठरेल. सूर्यप्रकाश हा झाडाच्या वाढीस महत्वाचा घटक आहे परंतु प...