विदर्भात दिसणार सीडलेस संत्रा - मोसंबी; आता कमी जागेत अन् कमी पाण्यात येणार उत्पन्न
विदर्भात दिसणार सीडलेस संत्रा - मोसंबी; आता कमी जागेत अन् कमी पाण्यात येणार उत्पन्न देशात लिंबूवर्गीय फळपिकांची लागवड वाढली आहे. या फळांच्या निर्यातीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशातून दरवर्षी साधरण ८० ते ९० हजार टन लिंबूवर्गीय फळपिकांची निर्यात होते. दरम्यान संत्रा मोसंबीची फळ पिकांचे उत्पादन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. कारण नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेने संत्र्यांच्या दोन आणि मोसंबीच्या चार अशा सहा नव्या प्रजाती विकसित केल्या असून या प्रजाती सर्व सीडलेस आहेत. येत्या चार ते पाच वर्षात विदर्भातील बाजारपेठेत ही फळे दिसणार असून अधिक उत्पन्नाची हमी शेतकऱ्यांना मिळेल, असा विश्वास संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी व्यक्त केला. याविषयी बोलताना लदानिया म्हणाले की, मागील पाच ते सहा वर्षांपासून संस्थेच्या फार्मवर या प्रजातींचे रोपण करुन त्यांचे संशोधन सुरू होते. या सहा वर्षाच्या प्रयत्नांना यश आलेल्याचे लदानिया म्हणाले. या विषयीची माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. पुढील वर्षापासून या सहा प्रजातींच्या कलमे शेतकऱ्यांना उपलब्ध करु...