पोस्ट्स

फवारणीसाठी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

छोट्या बाटलीमधील डि-कंपोजर शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर; जाणून घ्या कृती आणि फायदे

इमेज
छोट्या बाटलीमधील डि-कंपोजर शेतकऱ्यांसाठी आहे फायदेशीर; जाणून घ्या कृती आणि फायदे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी वेस्ट डि-कंपोजर बनवलं आहे. उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. गायीच्या शेणातील जिवाणू पासून तयार केलेले हे कल्चर एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामध्ये पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनीच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. संस्थेद्वारा पुरविलेल्या कल्चर पासून २०० लिटर द्रावण तयार करता येते. या द्रावणापासून पुन्हा लाखो लिटर द्रावण तयार करता येते. हे एकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी व कमी खर्चिक आहे.ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध ना...