पोस्ट्स

mango लेबलसह पोस्ट दाखवत आहे
हापूस आंब्याला अल्फान्सो ऐवजी 'हापूस' हे नाव कसं पडलं? आंबा म्हणजे फळांचा राजा! त्यातल्या त्यात हापूस म्हटलं तोंडाला पाणी सुटतंच . फळांच्या या राजाला जगभरातून मागणी असते. आणि देशाविदेशात तर हापूस जणू काही पेटंट झाला आहे. म्हणूनच फळांच्या या राजाबद्दल ही चवदार माहिती जाणून घेणं महत्त्वाचं. या आंब्याला हापूस का म्हणतात? हापूसला अल्फान्सो असंही म्हटलं जातं, आणि या नामकरणात भारतातील पोर्तुगिजांचाही मोठा वाटा आहे. पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते. पोर्तुगिजांचं इथे राज्य उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. जिओग्राफीकल इंडिकेशन जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार अल्बकर्की यांनी गोव्यात मोठी भटकंती केली होती. तिथल्या आंब्यांच्या विविध जातींवर त्यांनी प्रयोग करत आंब्याची ही नवी जात विकसित केली. त्यावरून या आंब्याला अल्फान्सो नाव मिळालं. पण स्थानिक लोक या आंब्याला अफूस म्हणू लागले. आंब्याची ही जात महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचेस्तोवर लोकांच्या तोंडी याचा उच्चार हापूस असा झाला होता. तिथून हा आंबा दक्षिण गुजरात आणि दक्षिण भारतात पोहोचला. हापूस आंब्यांचा ...

आंब्यापासून बनवा विविध पदार्थ; प्रक्रिया उद्योगासाठी आंबा सूपर फळ

इमेज
आंब्यापासून बनवा विविध पदार्थ; प्रक्रिया उद्योगासाठी आंबा सूपर फळ आंबा हे फळ आपल्याला सगळ्यांना त्याच्या सुमधूर चव आणि सुगंध यासाठी परिचित आहे, तसेच त्यामध्ये असलेल्या अति गर मुळे आंब्याला फळांचा राजा असे संबोधले जाते. जर आंबा व त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा विचार केला तर आंब्यापासून बनलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना वर्षभर आपल्या देशात व अन्य देशात बाहेरील भरपूर मागणी असते. त्यामुळे आंबा फळ प्रक्रिया उद्योग हा एक निश्चितपणे यशस्वी होण्याचा एक खात्रीलायक मार्ग आहे. या लेखामध्ये आपण आंब्यापासून तयार होणाऱ्या विविध प्रक्रियायुक्त पदार्थांना विषयी माहिती घेणार आहोत. आंब्यापासून स्क्वॅश बनवणे जर आंब्यापासून स्पेशल बनवायचे असेल तर आंबे हे टणक आणि आंबट पण असलेल्या हवे. अगोदर कच्च्या आंब्याचा वापर करताना फळे शिजवून त्यामधील गर काढावा लागतो. यामध्ये एक किलो गरात एक किलोग्राम साखर, एक लिटर पाणी, 20 ते 30 ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि गरजेप्रमाणे नारंगी, पिवळा खाण्याचा रंग या घटकांचा वापर करतात. तयार झालेल्या स्क्वॅश चा ब्रिक्स 45 अंश तर आम्लता 1.5 टक्के असावी.. स्क्वॅश तयार झाल्यानंतर एक मिली च्या...