सातबारा उतारा कधीपासून मोफत मिळणार? काय झालेत नेमके बदल?
सातबारा उतारा कधीपासून मोफत मिळणार? काय झालेत नेमके बदल? शेतकऱ्यांना डिजिटल सहीच्या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत मोफत आणि घरपोच देण्याचा निर्णय महसूल विभागानं घेतला आहे. यासाठी महात्मा गांधी जयंतीपासून म्हणजेच 2 ऑक्टोबरपासून महसूल विभाग विशेष मोहीम हाती घेणार आहे. गावपातळीवर तलाठी आणि कोतवाल यांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय 1 सप्टेंबर 2021 रोजी जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार, सुधारित सातबारा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी जो खर्च येईल, तो जिल्हा सेतू समितीकडील निधीमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सातबारा उताऱ्याची सुधारित प्रत एका खातेदारास फक्त एकदाच मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुधारित सातबारा असा असेल... महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात प्रमुख 11 बदल केले आहेत. जवळपास 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात बदल करण्यात आले आहेत. हा सुधारित सातबारा उतारा महसूल दिनापासून (1 ऑगस्ट 2021) सामान्य जनतेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. सातबारा उताऱ्यातील गाव नमुना-7 मध्ये कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, याच...