दुधाळ जनावरे घेताना कशी घ्यावी काळजी
दुधाळ जनावरे घेताना कशी घ्यावी काळजी दुग्ध व्यवसायासाठी बाजारातून जनावरे विकत घेताना अनेक गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.त्यात महत्त्वाचे म्हणजे पशुपालकांची गरज,त्याचे आर्थिक क्षमता,पाणी व हिरव्या चाऱ्याची उपलब्धता या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याकडील उपलब्ध परिस्थितीत दुधा जनावराची कोणती जात नफा देऊ शकेल अशी जात निवडावी. जर फक्त दूध उत्पादन हाय पशुपालकाचे हेतू असेल तर म्हैस पालन करणे कधीही उत्तम ठरते. या लेखात आपण दुधाळ जनावरांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी याविषयी माहिती घेऊ. दुधाळ जनावरांची निवड कशी करावी? जनावराचा पाठीचा कणा वाकलेला असू नये. जनावरांची पहिली बरगडी दिसते स्वाभाविक असले तरी तिसरा बरगडी पर्यंत दिसणारी जनावरे अशक्त या प्रकारात मोडतात. गाईच्या पोटाचा तसेच छातीचा भाग लांब, खोल आणि रुंद असावा. उत्तम खाद्य पचवण्याची क्षमता असलेल्या जनावरांची निवड करावी. कास आणि सडाची तपासणी करावी. कासेची खोली मापक व क्षमता पुरेशी असावी. सड काशेच्या प्रत्येक चतुर्थांश प्रमाणबद्ध असावी. काटकोनात स्थित असावेत.मागील कास रुंद, उंच व घट्टपणे शरीराशी संलग्न असावी. किंचित व...