शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल.
शेतकऱ्यांनी केव्हां, काय, का लावावे? म्हणजे भरपूर फायदा होईल. दरवर्षी १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी व जूनच्या पहिल्या आठवड्यात काकडी लावावी. म्हणजे जुलै, ऑगस्टमध्ये आणि ऐन थंडीत काकडीचे पैसे हमखास होतात. महाशिवरात्रीस कांद्याचे रोप टाकून कांद्याची पात गुढी पाडव्यास लावावी. म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात. १७ मार्च ते १९ मे किंवा हल्लीच्या बदलत्या पावसाच्या हवामानात मृग किंवा आर्द्रा कोरडे जाते, तेव्हा ७ जूनपर्यंत दर आठ दिवसांनी पाण्याची उपलब्धता असेल तर ५ ते १० गुंठ्याचे कोथिंबीरीचे प्लॉट करावेत. म्हणजे उन्हाळ्यात कोथिंबीरीचे पैसे होतात. जून-जुलैमध्ये झेंडूचे बी टाकून रोप तयार करावे. म्हणजे हमखास झेंडूचे दसरा-दिवाळीत पैसे होतात. ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्यावर्षी एप्रिल-मे महिन्यात केलेल्या आल्याच्या लागवडीस वर्षभर जैविक औषधे सेंद्रिय खत वापरून आले ले 'न लागलेले आले' गणपतीपासून काढण्यास सुरुवात करावी, म्हणजे आल्याचे पैसे हमखास होतात. सप्टेंबरमध्ये हस्त बहार धरून लिंबाला भाव मिळून पैसे होतात. द्राक्षाची एप्रिल, ऑक्ट...