तेलः खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची 3 कारणं कोणती? तेल कधी स्वस्त होणार?
तेलः खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची 3 कारणं कोणती? तेल कधी स्वस्त होणार? मागच्या आठवड्यात एक बातमी तुम्ही वाचली असेल ज्यात म्हटलं होतं की, एप्रिल महिन्यात भारतात घाऊक व्यवहारांसाठीचा महागाई दर चक्क 10.49% नी वाढला. त्यापूर्वी मार्च महिन्यात तो साडे सात टक्क्यांनी आणि फेब्रुवारी महिन्यात तो सव्वा चार टक्क्यांनी वाढला होता . ही बातमी खोलात जाऊन वाचली तेव्हा लक्षात आलं की भाजीपाल्याच्या किंमती उलट दीड टक्क्यांनी कमी झाल्या होत्या. पण, पेट्रोल, डिझेल, इंधनं, तेल आणि उर्जा या क्षेत्रातली महागाई एप्रिल महिन्यात तब्बल 20%नी वाढली होती. म्हणजेच या वस्तूंचे दरही एका महिन्यात किमान 20%नी वाढले होते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी गाठलीच आहे. त्यात आता भर पडलीय ती खाद्यतेलाची. किंबहुना हे दरही मागचं वर्षभर वाढतच आहेत. आता याच आठवड्यातल्या ताज्या आकड्यांनुसार मागच्या 11 वर्षांतला उच्चांक खाद्यतेलांच्या किमतीने गाठला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरणाच्या वेबसाईटवर नुकतेच ताजे आकडे प्रसिद्ध झाले आहेत आपण घरगुती स्वयंपाकासाठी प्रामुख्याने शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, सूर्यफूल तेल, मोहरीचं त...