पोस्ट्स

खत लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेणखत न कुजलेले असेल तरीही फायदेशीर ठरते का ?

इमेज
शेणखत न कुजलेले असेल तरीही फायदेशीर ठरते का ? जमीन भुसभुशीत राहावी आणि जमिनीची योग्य प्रमाणात पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढावी. हे सर्व तेव्हाच शक्य होते जेव्हा शेणखत पूर्णपणे कुजलेले असते.  शेणखत न कुजलेले असेल तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात.  १) जेव्हा आपण असे शेणखत मुळांभोवती टाकतो तेव्हा त्याची कुजण्याची प्रक्रिया सुरूच असते. ह्या कुजण्याच्या प्रक्रियेत शेणखताचे तापमान 65ते75 डिग्री सेल्सिअस च्या आसपास जाते. त्यामुळे झाडाच्या मुळांना शॉक बसतो अथवा इजा होण्याची शक्यता असते. परिणामी झाडाच्या उत्पादकतेत घट होते. कुठलीही गोष्ट कुजण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. असे शेणखत कुजताना जमिनीतील ऑक्सिजन घेत असते आणि झाडांच्या मुळांनादेखील ऑक्सिजन आवश्यक असतोच. परिणामी हे कुजणारे शेणखत जमिनीतील ऑक्सिजनचा साठा कमी करते आणि झाडाच्या मुळांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे झाडाच्या आत काही चुकीची संप्रेरके स्रवतात आणि हे झाडाच्या उत्पादनक्षमतेला मारक ठरते.जर ह्या कुजणाऱ्या शेणखताला ऑक्सिजन मिळाला नाही तर ते सडण्याची प्रक्रिया सुरू होते. ह्या सडणाऱ्या शेणखतात उपद्रवी बुरशी वाढण्याचा...

खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना

इमेज
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची खतमात्रा ठरवावी. त्यामुळे गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते.   माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची खतमात्रा ठरवावी. त्यामुळे गरजेइतक्याच खतांचा पुरवठा केला जातो. संतुलित खत वापरामुळे उत्पन्नात वाढ होते. जमिनीचे आरोग्य चांगले राहते. पिकांना रासायनिक खतांद्वारे विविध पोषक अन्नद्रव्यांचा म्हणजेच नत्र (युरिया), स्फुरद (सुपर फॉस्फेट), पालाश (म्युरेट ऑफ पोटॅश), सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते (झिंक सल्फेट, आयर्न सल्फेट, बोरॅक्स) इत्यादींचा पुरवठा केला जातो. पिकांना दिलेली खतमात्रा पिकांकडून पूर्णतः शोषली जात नाही. पिके त्यातील काही अंश शोषून घेतात. उर्वरित अन्नद्रव्यांचा (पाणी, हवा, तापमान यामुळे) ऱ्हास होतो. वापरलेल्या एकूण खताच्या प्रमाणापैकी जो काही अंश पिके शोषण करतात आणि त्यामुळे जी उत्पादनात वाढ होते, त्यास ‘खत वापराची कार्यक्षमता’ म्हणतात. अन्नद्रव्ये आणि त्यांची कार्यक्षमता  अन्नद्रव्ये -------- कार्यक...