सोयाबीन लागवड माहिती
सोयाबीन लागवड माहिती 🌺👇🌺 जमीन -🌺👇🌺 मध्यम ते भारी, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीन लागवड करावी. 26 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी.आज शेतकरी पेरणी योग्य जमीन तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करतात. यामुळे जमीन मोठ्या प्रमाणावर भुसभुशीत होते. अशा जमिनीत पेरणी जर ट्रॅक्टरने केली तर बियाणे अधिक खोलीवर पडते. अशा वेळी सोयाबीनचे बाह्य आवरण पातळ व बीजांकुर व मुलांकुर बाह्य आवरणालगत असल्यामुळे सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, म्हणून खोल पेरणीनंतर किंवा अधिक हाताळणी झाल्यास त्याची उगवण कमी होते. त्यामुळे पेरणी करताना बियाणे तीन ते पाच सें.मी.पेक्षा अधिक खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच पेरणी 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी. सुधारित वाण - 🌺👇🌺 मराठवाडा - एमएयूएस 70, एमएयूएस 81, एमएयूएस 158, एमएयूएस 47. विदर्भ - एमएयूएस 71, एमएयूएस 81, जेएस 93-05 आणि जेएस 335 पश्चिम महाराष्ट्र - डीएस 228 (फुले कल्याणी), एमएसीएस 58, एमएसीएस 450, जेएस 93-05 आणि जेएस- 335. पेरणीचे अंतर - आपल्या भागासाठी शिफारस केलेल्या वाणांची 45 - 5 किंवा 30 - 7.5 सें.मी. अंत...