पोस्ट्स

green chillies लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मिरची लागवड तंत्रज्ञान

इमेज
मिरची लागवड तंत्रज्ञान नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण मिरची पिका बद्दल या लेखात माहिती करून घेणार आहोत. मिरचीही आपल्या रोजच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याबरोबर ते एक उत्तम व्यापारी पीक आहे. भारतीय हवामानात मिरची हे पीक उत्तमरीत्या वाढते. आपल्या देशातील मिरचीची परदेशात निर्यात केली जाते. मिरची निर्यातीमध्ये आपला जगात प्रथम क्रमांक लागतो. महाराष्ट्र मधील मिरची लागवडीखालील एक लाख 40 हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड,धुळे, चंद्रपूर, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, आणि अमरावती या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात मिरचीचे अनेक स्थानिक प्रकार आढळतात. उदाहरणार्थ लवंगी, संकेश्वरी, (कोल्हापूर) , वाल्हा( पुणे), मुसळवाडी( अहमदनगर ),देगलूर, धमीबादी (नांदेड), दोंडाईचा (धुळे) ,मलकापूर,(बुलढाणा) भिवापुरी (नागपुर )इत्यादी. हिरव्या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अ व क जीवनसत्व असतात.मिरची मध्ये असलेल्या कॅपसीन या रासायनिक द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा येतो. तर सुकलेल्या मिरच्यांना कॅपसीन या रंगद्रव्यामुळे लाल रंग येतो. मिरचीच्या भुक्तिमध्ये जास्तीत जास्त 1.5 टक्के तिखटपणा असतो. ...