21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस का आहे?
21 जून वर्षातला सर्वात मोठा दिवस का आहे? 21 जून हा 2021 वर्षातला सर्वात मोठा दिवस असणार आहे. याला इंग्लिशमध्ये Summer Solstice म्हटलं जातं. पण हे नेमकं का घडतं? समर सॉलस्टाईस ही एक खगोलीय घटना आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतलं पृथ्वीचं सूर्यासमोरचं स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. 21 जूनच्या दिवशी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते ज्यामुळे यादिवशी सर्वाधिक सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो. जगातल्या अनेक देशांमध्ये या दिवशी दिवस 12 तासांपेक्षाही मोठा असतो. यानंतर दक्षिणायनाला सुरुवात होते. म्हणजे वर्षाच्या या पुढच्या काळामध्ये सूर्य दक्षिण गोलार्धात सरकू लागतो. Summer Solstice म्हणजे काय? Solstice हा शब्द sōlstitium या लॅटिन शब्दावरून आला आहे. या लॅटिन शब्दातल्या sōl या शब्दाचा अर्थ होतो सूर्य. sistere या शब्दाचा अर्थ 'to stand still' म्हणजे स्तब्ध उभं राहणं. साधारण 20 जून ते 22 जून दरम्यानच्या एका दिवशी दरवर्षी समर सॉस्टाईस घडतं. म्हणजे 20, 21 वा 22 पैकी एक दिवस हा त्या वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. यावर्षी 21 जून ह...