खतातील बनावटपणा असे ओळखा
खतातील बनावटपणा असे ओळखा पेरणी झाल्यानंतर पिकांची व्यवस्थित वाढ होण्यासाठी शेतकरी पिकांना युरिया पुरवत असतात. पण राज्यात यंदा युरिया आणि खतांचा तुटवडा झाला होता. अशात बनावट खतांची विक्री होत असते यामुळे शेतकऱ्यांची मोठे आर्थिक नुकसानीसह पिकांचे नुकसान होत असतात. बाजारात अनेक दुकानदार बनावट खतांची विक्री करत असतात. अनेक वेळा डीएपीमध्ये खडे आढळून येत असतात. सर्वात जास्त महाग असलेल्या अमोनिया फास्टेटमध्ये खूप बनावट होत असते. आजच्या लेखात आपण बनावट खते कशा पद्धतीने ओळखाची याचे टिप्स देणार आहोत. या टिप्समुळे शेतकऱ्यांची होणारे नुकसान वाचणार आहे. डीएपी – असली आहे किंवा नकली हे ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे. डिएपीची काही दाने हातात घेऊन तंबाखूला चूना लावून मळतात तशापद्धतीने डीएपीच्या दाणेला चूना लावून मळावे. मळल्यानंतर जर त्यातून दीर्घ वास येत असेल आणि त्याचा वास घेणेही असह्य असेल तर समजावे की, हे असली डीएपी आहे. यात अजून एक सोपी पद्धत आहे, डीएपीचे काही दाणे कमी आचेवर तवा गरम करुन त्यावर टाकावे. जर दाणे फुटले तर समजावे की हे डीएपी असली किंवा खरे आहे. पाण्यात विरघळतो युरिया – युरियाचे दाणे ह...