जाणून घ्या, झाडांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो
जाणून घ्या, झाडांवर बुरशीचा प्रादुर्भाव कसा होतो बुरशीला स्वतःचे पोषण करण्यासाठी झाडात असलेली अन्नद्रव्ये खाणे गरजेचे असते . हीच अन्नद्रव्ये खाऊन बुरशीची वाढ होत असते . मात्र , बुरशीचा झाडावर नेमका कसा प्रादुर्भाव होतो याचे एक विशिष्ट प्रकारचे चक्र असते . ते कसे काम करते हे पाहूया : १ ) वातावरणात बुरशीचे बीजाणू ( स्पोअर्स ) असतातच. हे बीजाणू झाडाच्या पानावर येऊन बसतात . ही फक्त एक सुरुवात असते. पानावर स्थिर झाल्यानंतर ही बुरशी एक चिकट पदार्थ बाहेर टाकते , ज्यामुळे हे बीजाणू पानाला घट्ट चिकटून बसतात . परिणामी , जोरदार पावसातदेखील ही बुरशी पानापासून वेगळी होऊ शकत नाही . ३ ) यानंतर बुरशीची वाढ सुरू होते . सर्वप्रथम हे बीजाणू पानातील पाणी घ्यायला सुरुवात करतात . बियांपासून जसे अंकुर फुटतात तशाच पध्दतीने बुरशीच्या बीजाणू पासून बुरशीचा जन्म होतो. या नवीनच जन्म झालेल्या बुरशीला अन्नाची फार गरज असते. ही बुरशी अन्न मिळवण्यासाठी बारीक धाग्यांसारखे तंतू ( hyphae ) इतस्ततः पसरवण्यास सुरुवात करतात. हे तंतू विशिष्ट प्रकारचे द्रव बाहेर टाकतात, जेणेकरून झाडाचा तो भाग बुरशीसाठी खाण्यायोग्य ...