लिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र
लिंबाच्या निरोगी आणि सदृढ रोप निर्मितीचे तंत्र भारतामध्ये आंबा, केळीच्या नंतर लिंबुवर्गीय फळांच्या उत्पादनाचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील या फळपिकांखालील क्षेत्र 0.483 मिलीयन हेक्टर असून 4.251 मिलीयन टन एवढे वार्षिक उत्पन्न आहे. लिंबूवर्गीय उत्पादनात जगात भारताचा सहावा क्रमांक लागत असून 4.8% वाटा भारताचा आहे. या फळपिकांखालील क्षेत्रात वार्षिक 9.3% या दराने वाढत असले तरी उत्पादनात मात्र त्याप्रमाणात वाढ झालेली नाही. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत भारताचे लिंबूवर्गीय उत्पादन फारच कमी म्हणजे ते फक्त 8.8 टन/हे. आहे. तेच प्रगत राष्ट्रात 25 ते 30 टन/हे. आहे. विदर्भात लिंबूवर्गीय फलोत्पादनाचे क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात असून दरवर्षी 80 लक्षाहून जास्त रोपे येथील 325-350 शासकीय व खाजगी रोपवाटीकेत तयार करून विकली जातात. रोपवाटिकेचे चांगले व्यवस्थापन हे स्वस्थ व उत्पादनक्षम लिंबूवर्गीय फलोउद्योगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने उत्तम फळाचे भरघोस उत्पादन देणाऱ्या वाणाचे जेवढे महत्त्व आहे. तेवढेच मातृवृक्षाला कीड व रोगापासून सुरक्षित ठेवणेही महत्त्वाचे आहे. विषाणूग्रस्त रोगट मातृवृक्ष...