पीक उत्पादनवाढीमध्ये मुळीचे महत्व
पीक उत्पादनवाढीमध्ये मुळीचे महत्व वनस्पतींना किंवा पिकांना एकुण दोन प्रकारच्या मुळ्या असतात. एक पांढरी मुळी आणि दुसरी काळी किंवा लालसर रंगाची मुळी या दोन मुलांचे वेगवेगळे फायदे व गुणधर्म आहे ते आपण समजून घेऊयात. 1) पांढरी मुळी :- पांढरी मुळी ही वनस्पतीचा मुख्य भाग आहे.या मुळीस काही ठिकाणी केशमुळ देखिल म्हणतात. ह्या मुळीचा शेंड्याकडील बराच भाग हा पांढरा असतो. म्हणून ह्या मुळीला पांढरी मुळी म्हणतात. ह्या मुळीचे मुख्य कार्य म्हणजे जमिनितील अन्न व पाणी शोषणे होय. म्हणून या मुळीस वनस्पतीचे खाणारे तोंडदेखिल म्हणतात. ज्या पिकामध्ये पांढरया मुळांची संख्या जास्त म्हणजे खाणारी तोंडे जेवढी जास्त तेवढ़े त्या पिकांची उत्पादन जास्त व पिके सुदृढ असतात.अशा पीकामध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. वनस्पतींच्या पांढरी मुळीच्या तोंडाजवळ जेवढे अन्न किंवा खत येईल तेवढेच खत किंवा अन्न सदर मुळी शोषण करीत असते. दूरचे अन्न किंवा खत सदर मुळ शोषून घेऊ शकत नाही म्हणून जेवढया पिकास पांढरया मुळ्या जास्त तेवढे पिक जास्त अन्न शोषण करीत असते व तेवढे पिक सशक्त व पिकांचे उत्पन्न जास्त असते. 2) काळी मुळी: - या ...