पोस्ट्स

प्रधानमंत्री पिक विमा योजना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदवता येईल पीक नुकसानीची माहिती

इमेज
  शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदवता येईल पीक नुकसानीची माहिती पुणे : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. पण विमा कंपन्यांना त्यांच्या नियमानुसार दिलेल्या मुदतीत नुकसानीची माहिती देता आली नाही, केवळ या एकाच कारणाने विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने (central goverment) दिलासा दिला आहे. यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (prime minister crop insurance scheme) खास अॅप विकसित केले आहे. याला ‘क्रॉप इन्शुरन्स अॅप’ असे नाव दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील पीक नुकसानीची माहिती घरबसल्या नोंदविता येणार आहे.राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती ही या अॅपच्या माध्यमातून घरबसल्या विमा कंपन्यांना निश्‍चित मुदतीत देता येणार आहे.   खरीप हंगामातील पिकांसाठी गेल्या वर्षीपासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिकाच्या नुकसानीची माहिती ही नुक...