अधिक उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय-रासायनिक शेती करणे ही काळाची गरज
अधिक उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय-रासायनिक शेती करणे ही काळाची गरज जमिनीची सुपीकता व उत्पादकता जोपासण्यासाठी फक्त सेंद्रिय खते वापरणे हा एकमेव उपाय नाही. तसेच रासायनिक खताचा त्याग करून आणि सेंद्रिय खते वापरून अशी सेंद्रिय शेती फायदेशीर होणार नाही. त्याचप्रमाणे दोन्ही खते अन्नद्रव्याच्या प्रमाणत दिली तरी अन्नद्रव्याची उपलब्धता आणि उत्पादन परिणामकारकता सारखी नसते. याविषयी माहिती या लेखात वाचावयास मिळणार आहे. हल्ली सेंद्रिय शेती व रासायनिक शेती याविषयी बरेच वाद-विवाद होत आहेत. जमिनीची सुपिकता व उत्पादकता जोपासण्यासाठी फक्त सेंद्रिय खते वापरणे हा एकमेव उपाय नाही. हल्ली शेतकरी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करू लागला आहे. सेंद्रिय शेती म्हणजे फक्त सेंद्रिय पदार्थांचा वापर. रासायनिक खताचा त्याग करून आणि सेंद्रिय खते वापरून अशी सेंद्रिय शेती फायदेशीर होणार नाही. रासायनिक खते जेव्हापासून शेतीस वापरण्यास सुरुवात झाली तेव्हा पिक परिस्थिती पाहून शेतकर्यांची मानसिकता रासायनिक खते वापरल्यास इतर खते वापरावयाची गरज नाही अशी होत गेली. अमर्याद पाणी व केवळ रासायनिक खताच्या वापरामुळे शेतजमीन कडक ...