ह्युमिक आम्ल शेतीसाठी ठरतंय फायदेशीर, ओसाड जमीन बनतेय सुपीक
ह्युमिक आम्ल शेतीसाठी ठरतंय फायदेशीर, ओसाड जमीन बनतेय सुपीक काळाच्या ओघात जसा शेती व्यवसायात बदल होत चालला आहे त्याप्रमाणे नवीन नवीन शोध लागत आहे. आजकाल आपण फक्त उत्पादन वाढीचा विचार करत आहोत पण जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत.हानिकारक रसायने वापरून आपण जमिनीची (soil) पोत कमी करत आहोत आणि याच परिणाम उत्पादनावर होतो.मातीची रचना तसेच खतक्षमता वाढविण्यासाठी ह्युमिक आम्ल महत्वाचे ठरते. ह्युमिक आम्ल कोणताही पिकावर परिणाम करत नाही. ह्युमिक आम्लमुळे रोपांची वाढ तसेच सुधारणा होते. ह्युमिक अँसिड म्हणजे काय? ह्युमिक आम्ल हे एक उपयुक्त खनिज आहे असे कृषितज्ञ डॉ. एस. के. सिंग यांचे मत आहे जे की याचा वापर पडीक जमीन सुपीक करण्यासाठी केला जातो. जमिनीत ओलावा राखण्यासाठी ह्युमिक आम्ल उपयोगाचे आहे.ह्युमिक आम्लमूळे जमिनीमध्ये खत चांगल्या प्रकारे विरघळते तसेच वनस्पती पर्यंत पोहचते. जमिनीमधील नायट्रोजन आणि लोह जोडण्याचे काम ह्युमिक आम्ल करते. ह्यूमिक आम्ल तयार करण्याच्या पद्धती:- डॉ.एस. के.सिंग यांचे असे मत आहे की ह्युमिक आम्ल बनवण्याची पद्धत जर शेतकऱ्यांनी समजली तर उत्पादनात वाढ होई...