पोस्ट्स

भाजीपाला निर्जलीकरण लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अन्न परिरक्षण : काळाची गरज

इमेज
अन्न परिरक्षण : काळाची गरज(Food Preservation) अन्नपरिरक्षण म्हणजे अन्न खराब होऊ न देता, दीर्घकाळ खाण्यायोग्य स्थितीत टिकविणे. अन्नपरिरक्षणाच्या पद्धतींमुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य, बाह्य स्वरूप, पोत, स्वाद व गुणवत्ता यांवर दुष्परिणाम घडवून आणणाऱ्या घटकांवर नियंत्रण राखणे शक्य होते. अन्नपदार्थ खराब होण्याची कारणे अनेक असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या अन्नपदार्थांसाठी व तो किती काळ सुरक्षितपणे साठवावयाचा आहे, यानुसार परिरक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती उपयोगात आणल्या जातात. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी जेव्हा शेती व पशुपालनाचा उदयदेखील झालेला नव्हता, तेव्हा मानवाने नैसर्गिकरीत्या परिरक्षित झालेले खाद्यपदार्थ कसे गोळा करावे, तसेच अन्नपरिरक्षणासाठी निसर्गाला कशा प्रकारे साहाय्य करावे, याचे ज्ञान प्राप्‍त केले होते. अश्मयुगातील मानव तेलबिया व इतर बिया हिवाळ्यासाठी साठवून ठेवत असे. तसेच मांस व मासे उन्हात वाळविले असता ते टिकू शकतात, याचाही त्याने शोध लावला होता. अशा रीतीने इतिहासपूर्व काळापासून अन्नपरिरक्षणाच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहेत. उदा.अन्नपदार्थ सुकविणे व आंबविणे (किण्वन) या का...