पोस्ट्स

honey लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालन

इमेज
शेतीपूरक व्यवसाय : डंखविरहित मधमाशीपालन कोकण विभागामध्ये वर्षभर आढळणारी, डंख विरहित मधमाशी (स्टिंगलेस बी) आहे. या माश्या केस, डोळे व कानावरही हल्ला करत असल्या तरी डंख नसल्यामुळे फारशी इजा (वेदना) होत नाहीत. हाताळणी करताना ‘ बिवेल ’चा वापर करावा.    पृथ्वीवर मधमाश्यांच्या एकूण २०,०९२ प्रजाती असून, त्यापैकी आपल्या देशात सातेरी (एपिस सेरेना इंडिका) आणि इटालियन (एपिस मेलिफेरा) या मधमाश्या मध आणि परागीकरणासाठी पाळल्या जातात. या दोन्ही डंख मारणाऱ्या मधमाश्या आहेत. मात्र कोकण विभागामध्ये वर्षभर आढळणारी, डंख विरहित मधमाशी (स्टिंगलेस बी) आहे. या माश्या केस, डोळे व कानावरही हल्ला करत असल्या तरी डंख नसल्यामुळे फारशी इजा (वेदना) होत नाहीत. हाताळणी करताना ‘बिवेल’चा वापर करावा.  डंखविरहित मधमाश्या या आकाराने लहान आणि सर्वांत लहान मध उत्पादक म्हणून ओळखल्या जातात. डंख नसणे, पुढील पंखांवर नसांचे कमी जाळे आणि मागील पंखांमध्ये जुगल लोबची उपस्थिती या खुणांमुळे वेगळ्या ओळखता येतात. या मधमाश्‍यांना ‘डॅमर बी’ म्हणून संबोधले जाते. हे ‘डॅमर’ म्हणजे डिप्परोकार्पच्या झाडापास...