पोस्ट्स

समस्या लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेतकऱ्यांसाठीची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजना तुम्हाला माहिती आहे का?

इमेज
शेतकऱ्यांसाठीची 'एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह' योजना तुम्हाला माहिती आहे का? Kisan credit card scheme : मागच्या काही वर्षांत शेतीत मोठे बदल होत आहेत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलाने आधुनिक शेतीकडे आताच्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना पूर्वी आणि आताही कोणत्याही संकटाना सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहेत. येणाऱ्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी शेतकरी कृषी अधिकाऱ्यांकडे या समस्या घेऊन जात असतो. त्या समस्येवरील उपाय विचारण्यासाठी शेतकऱ्यांना आता कृषी अधिकाऱ्याकडे जाण्याची गरज नाही.मोदी सरकारने काढलेल्या योजनेचा शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होताना दिसत आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत (Kisan credit card scheme) किसान कॉल सेंटरमधील प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एका फोनवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातच राहून समस्या निराकरण करता येत आहे. या योजतंर्गत तब्बल २२ भाषांमध्ये केंद्रातील तज्ज्ञ माहिती देतात. मागच्या काही महिन्यांमध्ये ३ लाखांवर शेतकर्‍यांनी शेतीविषयक माहिती घेत आपल्‍या शंकेचे निरसण केले ...