ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण प्रणाली
ट्रायकोडर्मा वितरणाची नावीन्यपूर्ण प्रणाली ट्रायकोडर्मा टिकण्याची क्षमता किंवा वैधता ही फक्त ६ महिने इतकीच असते. ही क्षमता वाढवण्याच्या मायक्रोबियल इनकॅप्सुलेशन तंत्रज्ञानाने ट्रायकोडर्माच्या गोळ्या (बायोकॅप्सूल) तयार करण्यात आल्या आहेत. निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या बुरशी आहे. काही रोगकारक, तर काही पिकांचे रोगापासून संरक्षण करणाऱ्या असतात. ट्रायकोडर्मा ही एक अशीच उपयुक्त बुरशी आहे. मातीमध्ये वाढणारी ट्रायकोडर्मा ही बुरशी सेंद्रिय पदार्थांच्या सान्निध्यात चांगल्या प्रकारे वाढते. ही बुरशी परोपजीवी व अन्य रोगकारक बुरशीवर उपजीविका करते. पिकांच्या जैविक रोगनियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा ॲस्परलम आणि ट्रायकोडर्मा हरझानियम या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. सुमारे ८७ वेगवेगळ्या पिकांवर आणि मातीमधील ७० रोगकारक बुरशी आणि झाडावरील १८ बुरशींच्या नियंत्रणामध्ये ट्रायकोडर्माचा वापर केला जातो. त्यातही ट्रायकोडर्मा ॲस्परलम ही प्रजाती खूप प्रचलित आहे. भारतामध्ये ट्रायकोडर्मा हा १८५० टन प्रति वर्ष वेगवेगळ्या प्रकारे तयार केला जातो. पिकातील वापर ः कापूस, तेलबिया, कडधान्ये, भाजीपाला अशा विविध पिका...