पोस्ट्स

wheat लेबलसह पोस्ट दाखवत आहे

बागायती शेतात उशिराने गव्हाच्या पेरणी केल्यास अधिक उत्पादन येण्याकरिता महत्त्वाची सूत्रे

इमेज
बागायती शेतात उशिराने गव्हाच्या पेरणी केल्यास अधिक उत्पादन येण्याकरिता महत्त्वाची सूत्रे गहू पिकाची पेरणी करण्यास उशीर झाल्यास योग्य उत्पादन तंत्राचा अंगीकार करून 15 डिसेंबरपर्यंत पेरणी करूनही बऱ्यापैकी गव्हाचे उत्पादन होऊ शकते. 15 डिसेंबर नंतर जसजसा उशीर होत, जाईल तसा-तसा गहू पिकाला थंडीचा कालावधी कमी मिळून उत्पादनात घट संभवू शकते. उशिरा पेरणीसाठी कोणत्या प्रकारचे गहूची लागवड केली पाहिजे याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी दिली आहे. बागायती उशिरा पेरणी करता पीडीकेव्‍ही सरदार (AKAW 4210-6), AKAW 4627, AKAW 381, पूर्णा (AKAW 1071) यासारख्या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. गहू पिकाच्या पीडीकेव्‍ही सरदार (AKAW 4210-6) या वाणाचे अधिक उत्पादन व अधिक मीळकतीसाठी पेरणी 26 नोव्हेंबर ते दोन डिसेंबरच्या दरम्यान करावी अशी शिफारस प्रसारीत करण्यात आली आहे. यासर्व संबंधित वाणाचे सर्व गुण वैशिष्ट्ये लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार ओलिताची सोय उपलब्धता लक्षात घेऊन योग्य त्या वाणाची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सल्ला घेऊन उशिरा बागायती पेरणीसाठी वाणाची निवड केली जाऊ श...

गव्हाची उशिरा पेरणी

इमेज
गव्हाची उशिरा पेरणी बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठीची नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा ही शिफारस असली तरी काही कारणांमुळे पेरणीची वेळ पाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. ऊस तोडणीनंतर, तसेच खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते. महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास 30 टक्के एवढे असते. यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने एकंदरीतच गहू लागवड क्षेत्रात घट येण्याची शक्यता आहे. बागायत उशिरा पेरणीची शिफारसही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र काही शेतकरी 15 डिसेंबर नंतरही गव्हाची पेरणी करतात. वास्तविक 15 नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी 2.5 क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते. हवामान : गव्हाच्या पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी 25 अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते. गव्हाचे व...