पोस्ट्स

machin लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे, यंत्रे

इमेज
मधमाशी पालन व्यवसायास लागणारी उपकरणे, यंत्रे भारतातही मधमाशी पालन व्यवसायामध्ये वाढ होत आहे. मधमाश्या पालनाचे यश पूर्णपणे मधमाशी वसाहतींची देखभाल, शास्त्रीय पद्धतीने केलेले व्यवस्थापन या प्रमाणेच त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रमाणित पेट्या, यंत्रे, उपकरणे आणि अवजारे यावर अवलंबून असते. मधमाशांच्या वसाहती विशिष्ठ प्रकारच्या पेट्यांमध्ये ठेवून त्यांचे पालन, पोषण आणि व्यवस्थापन केले जाते, त्यास आधुनिक मधमाशी पालन असे म्हणतात. मधमाशी पालन तंत्राचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल्यास चांगले मध उत्पादन व इतर उत्पादने घेता येतात. मधमाशी पालन व्यवसाय हा कृषी आधारित फायदेशीर व्यवसाय आहे. मधमाशी वसाहतींच्या देखभाल, व्यवस्थापनासाठी प्रमाणित पेट्या, यंत्रे, उपकरणे आणि अवजारे यांची माहिती या लेखात घेऊ. भारतीय मधूपेटी निसर्गात मधमाश्या आडोशाच्या जागी, झाडांच्या ढोलीत समांतर पद्धतीने आपले मेणाचे पोळे बांधतात. त्यात मध, पराग, अंडी इ. साठवून ठेवतात. मधमाश्या कधीही एकट्या - दुकट्या नसतात. त्या कायम समूहातच वसाहत करून राहतात. एका वसाहतीत साधारणपणे १० ते ३५ हजार मधमाश्या असतात. त्यांची प्...