पोस्ट्स

types of lone लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शेती कर्जाचे प्रकार ।। जाणून घ्या महत्वाची माहिती

इमेज
शेती कर्जाचे प्रकार ।। जाणून घ्या महत्वाची माहिती  शेती कर्ज हा शेती व्यवसायातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच आज आपण पाहणार आहोत शेती कर्जाचे प्रकार तसेच कर्ज परतफेडीचे हप्ते याविषयीची माहिती. शेती कर्जाचे बरेच प्रकार येतात परंतु त्याच्या वापरावरून किंवा त्याच्या हेतू वरून कर्जाचे प्रकार पडतात. सुरुवातीला दोन प्रकार पाहूया तिसरा प्रकार शेवटी थोडक्यात पाहू. १. Working Capital / पीक कर्ज २. Term Loan / मुदत कर्ज ३. माल तारण कर्ज 1) पीक कर्ज : जे प्रत्येक वर्षी खर्च येतात त्याला पीक कर्ज म्हटले जाते. ज्यामध्ये बी-बियाणे, आंतरमशागती, खते व औषधे किंवा लेबर खर्च असेल यांचा खर्च ज्या कर्जा मध्ये येतो त्याला पिक कर्ज म्हणून ओळखला जाते. जमिनीच्या मशागतीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंतचा जेवढा खर्च येतो तो खर्च या कर्ज मध्ये येतो. याची खासीयत अशी असते की हे पीक कर्ज तुम्ही वर्षातून कितीही वेळा भरू शकता आणि कितीही वेळा काढू शकता. म्हणजे बँकेने तुम्हाला ठराविक मुदत दिलेली असेल त्या मुदतीमध्ये तुम्हाला हे पीक कर्ज भरायचे तर आहेच परंतु त्याच्या आधे मधे तुमच्याकडे काही पैसे आले तर त...