शेतात अंडा संजिवक वापरा आणि बघा अप्रतिम बदल.
शेतात अंडा संजिवक वापरा आणि बघा अप्रतिम बदल. अर्थातच शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे हाच त्याचा मोठा उद्देश व जमीन टिकवणे हाही एक उद्देश असावा त्या अनुषंगाने शेतात अंडा संजीवक वापरल्याने अप्रतिम बदल दिसून येतात व पिकांना आणि मातीला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. दूध हे पूर्ण अन्न आहे , अंड्यात लागणारे व्हिटॅमिन व प्रोटीन असतात तर गुळामध्ये पिकास आवश्यक असणारे मिनरल्स असतात . मी गेल्या 1 वर्षांपासून तसेच मित्रांच्या देखील डाळीम्ब , हळद , द्राक्ष , आंबा या बागावर यांचे प्रयोग केले. याचे उत्तम परिणाम पहायला मिळतात. याला दोन प्रकारे वापरता येते फवारणी 1 ली गायीचे किंवा म्हशीचे न तापवलेले दूध , 4 अंडी गावरान किंवा बॉयलर , 400 ग्राम गुळ हे सर्व एकत्र तयार करून फवारणीच्या 1 ली पाण्यात 5 मिली द्रावण टाकणे , म्हणजेच 15 ली चा पम्प असेल तर 75 मिली आणि तापमान कमी असताना फवारणी करणे. मला आढळून आलेला फरक झाडांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते ,निर्देशांक पान वाढतो , सूक्ष्म अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात मिळून पीक अतिशय निरोगी राहते जमिनीतून पाण्यावाटे 5 ली दूध , 12 ...