बागायती शेतात उशिराने गव्हाच्या पेरणी केल्यास अधिक उत्पादन येण्याकरिता महत्त्वाची सूत्रे
बागायती शेतात उशिराने गव्हाच्या पेरणी केल्यास अधिक उत्पादन येण्याकरिता महत्त्वाची सूत्रे गहू पिकाची पेरणी करण्यास उशीर झाल्यास योग्य उत्पादन तंत्राचा अंगीकार करून 15 डिसेंबरपर्यंत पेरणी करूनही बऱ्यापैकी गव्हाचे उत्पादन होऊ शकते. 15 डिसेंबर नंतर जसजसा उशीर होत, जाईल तसा-तसा गहू पिकाला थंडीचा कालावधी कमी मिळून उत्पादनात घट संभवू शकते. उशिरा पेरणीसाठी कोणत्या प्रकारचे गहूची लागवड केली पाहिजे याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी दिली आहे. बागायती उशिरा पेरणी करता पीडीकेव्ही सरदार (AKAW 4210-6), AKAW 4627, AKAW 381, पूर्णा (AKAW 1071) यासारख्या वाणाची शिफारस करण्यात आली आहे. गहू पिकाच्या पीडीकेव्ही सरदार (AKAW 4210-6) या वाणाचे अधिक उत्पादन व अधिक मीळकतीसाठी पेरणी 26 नोव्हेंबर ते दोन डिसेंबरच्या दरम्यान करावी अशी शिफारस प्रसारीत करण्यात आली आहे. यासर्व संबंधित वाणाचे सर्व गुण वैशिष्ट्ये लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार ओलिताची सोय उपलब्धता लक्षात घेऊन योग्य त्या वाणाची तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष सल्ला घेऊन उशिरा बागायती पेरणीसाठी वाणाची निवड केली जाऊ श...